Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसरकारी दवाखाना तीन महिन्यांपासून बंद

सरकारी दवाखाना तीन महिन्यांपासून बंद

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुक्यातील खंबाळे Sinnar- Khambale येथील आयुर्वेदिक सरकारी दवाखाना Ayurvedic Government Hospital तीन महिन्यांपासून बंद असून नवीन डॉक्टरांची नेमणूक करण्यात आलेली असताना ते एकदाही दवाखान्यात आलेले नसल्याने परिसरातील रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांची हेळसांड करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी सामन्यांमधून होत आहे.

- Advertisement -

या दवाखान्यात खंबाळे, भोकणी, सुरेगाव, माळवाडी आदी गावांतील लोक उपचारासाठी येतात. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी कायम गैरहजर राहत absentisam of medical officerअसल्याने नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागतो. यामुळे सामान्यांना सरकारी रुग्णालय असतानाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

वैद्यकीय अधिकारी नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून दवाखाना बंद असून वैद्यकीय अधिकार्‍यांची बदली झाल्यानंतर या आयुर्वेदिक सरकारी दवाखान्यात नवीन डॉक्टरांची नेमणूक करण्यात आलेली आहे. दवाखान्यात नवीन डॉक्टरची नेमणूक होऊनही ते का येत नाहीत याची साधी चौकशी करण्याची तसदी येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेली नाही.

संबंधित डॉक्टर आणि ग्रामपंचायत प्रशासनाने येथील सामान्य रुग्णांना वार्‍यावर सोडून दिले आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने पाठपुरावा करून लवकरात लवकर दवाखान्यात डॉक्टरची नेमणूक करण्याची मागणी खंबाळेसह परिसरातील गावांतील ग्रामस्थांकडून होत आहे.

खासगी दवाखान्यात उपचार

गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीने लोकांचे हाल झाले आहेत. त्यात करोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे विविध साथीचे आजार येऊ शकतात. अशा परीस्थितीत गावात दवाखाना असताना रुग्णांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा लागतो हे गावचे दुर्दैव म्हणावे लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या