अमरिंदर सिंग यांचा दावा : सिद्धूच्या मंत्रिमंडळातील शिफारशीसाठी पाकिस्तानातून शिफारस

2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election)राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amarinder singh)यांनी मोठा दावा केला आहे. अमरिंदर सिंग म्हणाले की, नवज्योतसिंग सिद्धू (navjot sidhu)यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्याची शिफारस पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती. दरम्यान अमरिंदर सिंग यांच्या दाव्याबाबत नवज्योत सिद्धू (navjot sidhu) यांना विचारले असता, याविषयावर नंतर बोलू, असे सांगत बोलणे टाळले.

मालेगावच्या युवकाच्या उद्योगात ‘लेन्सकार्ट’चे सीईओ झाले भागिदार

सोमवारी पत्रकार परिषद घेताना कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, ‘पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी विनंती केली होती की, सिद्धू माझे जुने मित्र आहेत. तुम्ही सिद्धूंना तुमच्या मंत्रिमंडळात घेतले तर मी आभारी राहीन. त्यांनी काम न नसल्यास त्यांना काढून टाका, पण आता मंत्रिमंडळात घ्या.’

सोनिया-प्रियांका गांधी यांना संदेश पाठवला होता

कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, मी हा संदेश सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना पाठवले आहेत. यावर सोनियांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र प्रियंका म्हणाली की, एक मूर्ख माणूस आहे जो असे मेसेज करत आहेत.

सिद्धू म्हणाले, यावर नंतर बोलू

नवज्योत सिद्धू यांनी आम आदमी पक्षाच्या सर्वेक्षणासंदर्भात चंदीगडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या दाव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हा आजचा मुद्दा नाही. याबाबत पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *