Friday, April 26, 2024
Homeनाशिकआकर्षक भव्य पतंग घेताय सर्वांचे लक्ष वेधुन

आकर्षक भव्य पतंग घेताय सर्वांचे लक्ष वेधुन

येवला । प्रतिनिधी Yevla

मकरसंक्रांत म्हणजे येवलेकरांचा पतंगोत्सव. हा उत्सव बच्चे-कंपनीबरोबर अबालवृद्ध आणि सर्वच कुटुंबीय उत्साहाने साजरा करतात. त्याच उद्देशाने येथील धडपड मंचचे वतीने सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी भव्य असे दोन पतंग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लावणेत आले आहेत.

- Advertisement -

येवला हे पतंगबाजाचे गाव. संक्रांतीचे तीन दिवस आबालवृद्धांसह बच्चे कंपनी पतंग उडविण्याचा आनंद घेतात. तीन दिवस चालणारा पतंगोत्सव बघण्यासाठी बाहेरगावहून नागरिक येतात. हल्लीच्या धकाधकीच्या काळात व्हाट्सअप, फेसबुक अशा सोशल मिडियाच्या काळात फोन किंवा चॅटद्वारे भेटुन सण साजरा करण्याची परंपरा वाढत चालली असली तरी येवल्यातील संक्रांत सणाचे वलय अजून कमी झालेले नाही. अशा ह्या संक्रांत सणासाठी शहरात लगबग सुरु झाली आहे.

ह्या पारंपारीक सणाची आठवण रहावी व सणाचे एक मंगलय वातावरण टिकुन राहण्यासाठी येवल्यातील सेवाभावी संस्था धडपड मंच कायमच प्रयत्नशिल असते. धडपड मंचचे प्रभाकर झळके यांनी सुंदर असे मोठे डिजीटल पतंग बनविले असून त्यास आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. शहरातील मध्यावधी ठिकाण असलेले मेनरोड येथे हे पतंग लावण्यांत आले आहे. हे आकर्षक भव्य पतंग येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष वेधुन घेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या