Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशगुगलने का मागितली भारतीयांची माफी?

गुगलने का मागितली भारतीयांची माफी?

नवी दिल्ली

गुगल (Google) सर्च इंजिन आपल्या नेहमीच्या कामाचा भाग झाला आहे. कोणताही विषय असला की आपण शोधण्यासाठी गुगलची मदत घेतो. परंतु जगातील सर्वात मोठे ऑनलाइन सर्च इंजिन गुगलने भारतीयांची माफी मागितली आहे.

- Advertisement -

गुगल लॉन्च करणार खिशाला परवडणारा स्मार्टफोन

गुगलच्या (google) एका चुकीमुळे कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळेच गुगलने याप्रकरणी जाहीररित्या माफी (apologises) मागितली आहे. कंपनीने आपल्या सर्च इंजिनच्या माध्यमातून कन्नड भाषेला भारतातील सर्वात घाणेरडी भाषा म्हटले होते. यानंतर भारतीयांकडून गुगलचा कडवा विरोध झाला. नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, गुगलने ट्विट करत झालेल्या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता गुगलला आपली चूक लक्षात आली आणि त्याचीच माफी मागण्यात आली आहे. सर्च इंजिन कंपनीने दावा केला, की हे कंपनीचे विचार नसून एक तांत्रिक बिघाड होता. गुगलवर जेव्हा लोकांनी ‘ugliest language in India’ (भारतातील सर्वात घाणेरडी भाषा) असे सर्च केले असता रिझल्टमध्ये ‘कन्नड भाषा’ असे दिसून येत होते. कर्नाटक सरकारने सुद्धा याला तीव्र विरोध केला.

काय म्हटले गुगलने

भारतात होणाऱ्या विरोधानंतर अखेर गुगल इंडियाचे प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिले. गुगलच्या सर्च इंजिनमध्ये सापडणाऱ्या अनेक गोष्टी सत्यच असतात असे नाही. अनेकदा इंटरनेटवर विचारलेल्या प्रश्नांची धक्कादायक उत्तरे येतात. हे चुकीचे असल्याचे आम्ही मान्य करतो. तरीही अशा गोष्टींची तक्रार मिळताच ती चूक दुरुस्त केली जाते. सोबतच, गुगलच्या एल्गोरिदममध्ये आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत. गुगलचे विशिष्ट असे काहीच विचार नाहीत. तरीही गैरसमजुतीने लोकांची मने दुखावली आहेत. त्याबद्दल आम्ही माफी मागतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या