Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिर्डीत करोना रुग्णांसाठी उपचार व्यवस्था उपलब्ध करावी - गोंदकर

शिर्डीत करोना रुग्णांसाठी उपचार व्यवस्था उपलब्ध करावी – गोंदकर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्यात तसेच आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र

- Advertisement -

शिर्डी परिसरातील वाढत्या करोना रूग्णांसाठी उपचार व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

रमेश गोंदकर यांनी नुकतीच मुंबईत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेंट घेवून नगर जिल्ह्यातील विषेशत: शिर्डी परिसरात वाढत्या करोना रूग्णांबाबत त्यांचे लक्ष वेधले. साईबाबा संस्थान प्रशासनाने करोना रूग्णांसाठी मोठी अद्यावत इमारत उपलब्ध करून दिली असून डॉक्टर, परिचारीका आणि उपचारही सोय करून दिली आहे.

मात्र साईबाबा संस्थानला काही मर्यादा असल्याने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने साईसंस्थानच्या कोविड सेंटरमध्ये आवश्यक व्हेंटीलेटर, औषध साठा आणि वैद्यकीय पथक तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी ना. टोपे यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी श्री. गोंदकर यांनी केलेल्या सुचनांची ना. राजेश टोपे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून शिर्डीत साईसंस्थानच्या कोविड रूग्णालयासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करण्याबाबतची सुचना वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

शिर्डीतील जुन्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी दिलीप वळसे पाटील यांचे स्नेहाचे संबंध असल्याने गृहमंत्रीपदाची धुरा वळसे पाटलांकडे आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश गोंदकर यांनी त्यांची भेट घेवून शिर्डीतील विविध प्रश्नांवर चर्चा केली. शिर्डीतील गुन्हेगारी संपवण्यासाठी आपण लवकरच संबधीत पोलिस अधिकार्‍यांबरोबर चर्चा करणार असल्याचे आश्वासन वळसे पाटलांनी आपल्याला दिल्याचे श्री. गोंदकर यांनी सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या