Thursday, April 25, 2024
Homeनगरगोंडेगाव-जळगाव रस्त्याची दुरवस्था

गोंडेगाव-जळगाव रस्त्याची दुरवस्था

गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav

श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव ते जळगाव या मुख्य दळणवळण असणार्‍या रस्त्याची अनेक वर्षापासून अतिशय दुरावस्था झाली आहे. या रस्त्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने कोणी आम्हाला रस्ता देता का रस्ता? अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर व राहाता या दोन तालुक्यातील गावांना जोडणारा हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचा उपयोग ऊस उत्पादक तसेच रस्त्याच्या कडेला मोठी शेती असल्याने मोठ्या प्रमाणात शेती मालाचीही वाहतुक होते. रस्त्यात मोठमोठे खड्डे असल्याने शेतकर्‍यांचे व ऊस वाहतूक करणार्‍यांचे मोठे हाल होत आहेत. तसेच या परिसरातून मोठ्या प्रमाणात शाळेत विद्यार्थी जात असतात, गावातील बहुतांशी नागरिकांची लोकवस्ती या भागात आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे गावाशी दळणवळण सुरु असते. मोठी खड्डे चुकविताना छोटे मोठे अपघात घडत असतात.

गोंडेगाव-जळगांव रस्ता खड्डेमय झालेला असून या रस्त्यासाठी यापूर्वी एक किलो मिटर खडीकरण, मुरमीकरणासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च झाले. सदरचे काम सहा सात महिन्यापूर्वी झालेले असून ते काम अतिशय निकृष्ठ करून संबंधीत ठेकेदार मोकळा झाला. या दिवसामध्ये ही परिस्थिती असेल तर पुढे पावसाळयात अतिशय दयनिय अवस्था निर्माण होईल. त्यामुळे या रस्त्याकडे लोकप्रतिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी या भागातील शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे.

या रस्त्यात्याठी सुमारे 10 लक्ष रुपये खर्च केला परंतू संबंधित ठेकेदाराने रस्ता मशिनच्या साहाय्याने उकरून त्यावर खडी न टाकता मुरुमाची मलमपट्टी करून रोलिंग केला. त्यामुळे हा संपूर्ण निधी वाया गेला. संबंधित विभागाने या कामाची चौकशी करावी.

– शंतनू फोपसे

- Advertisment -

ताज्या बातम्या