Wednesday, April 24, 2024
Homeनगरगोदावरी कालव्यांना उद्या पाणी सुटणार

गोदावरी कालव्यांना उद्या पाणी सुटणार

अस्तगाव |वार्ताहर|Astgav

उन्हाळी आवर्तन घेण्यासाठी नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातुन उद्या गुरुवारी दि. 15 रोजी सकाळी 6 वाजता गोदावरीच्या

- Advertisement -

दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात येणार आहे. सुरुवातीला पिण्याला आणि नंतर सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे.

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील उभी पिके तीव्र उन्हा मुळे संकटात सापडली आहेत. कालव्याच्या पाण्याची चातका सारखी शेतकरी वाट पाहात आहेत. या आवर्तनाचा कार्यकाळ 1 महिना असेल. या आवर्तनालाच जोडून उपलब्ध पाण्यात दुसरे आवर्तन या आवर्तनालाच जोडून घेतले जाणार आहे.

सहा ते साडेसहा टिएमसी पाणी गोदावरी च्या कालव्यांसाठी उपलब्ध आहे. त्यातुन आता होत असलेल्या आवर्तनाला 3.5 टिएमएसी अथवा 4 टिएमसी पाण्याचा वापर होवु शकतो. हे आवर्तन झाल्यावर उर्वरित पाण्यावर दुसरे आवर्तन घेण्याचा जलसंपदा विभागाचा मानस आहे.

आज बुधवारी उशीरा अथवा उद्या गुरुवारी सकाळी 6 वाजता नांदूरमधमश्ेवर बंधार्‍यातुन गोदावरी च्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडले जाणार आहे. हे आवर्तन सोडण्याच्या पुर्वीच्या सर्व पक्रिया जलसंपदा विभागाने पार पाडल्या आहेत.

कालव्या काठचा विज पुरवठा खंडीत करण्यासाठी नगर तसेच नाशिक च्या विजवितरण कंपनीचे शटडाऊन बाबतच्या परवानग्या मिळविल्या आहेत. विनापरवाना पाणी घेणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी दोन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. डोंगळे काढण्याची प्रक्रिया सुरु होती.

दरम्यान गोदावरी उजव्या कालव्यावर 1400 हेक्टर तर डाव्या कालव्यावर 1200 हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या प्रतिक्षेत आहे. गोदावरीच्या दोन्ही कालव्यांसाठी दारणा, मुकणे तसेच वालदेवी या दारणा समुहातील धरणातुन पाणी काढण्यात येणार आहे. मराठवाड्याकडे जाणार्‍या जलद कालव्यासाठी भाम, भावली, वाकी, भावली या धरणातुन पाणी काढण्यात आले आहे.

नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन जलद कालव्याला 8 एप्रिललाच पाणी सोडण्यात आले आहे. जलद कालवा नियोजनापेक्षा तीन दिवसांनी उशीराने सोडण्यात आला आहे. आज बुधवारी सायंकाळी अथवा उद्या गुरुवारी सकाळी या बंधार्‍यातुन गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात येणार आहे.

बेकायदा पाणी उपसा होवु नये म्हणुन भरारी पथकाला संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती जलसंपदाचे नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिल्या आहेत. दोन्ही कालव्यांवर भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. असेही शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या