Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरकोणी नवरी देता का नवरी!

कोणी नवरी देता का नवरी!

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

कार्तीकी एकादशीनंतर तुलशी विवाहापासून लग्न संमारंभांना सुरुवात होते . सध्या लग्नसराईचा सिजन चालू झाला आहे मात्र, मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी असल्याने बेरोजगार व सामान्य नवरदेवांना मुली मिळणे मुश्किल झाले आहे. यामुळे युद्धपातळीवर दुरवरच्या नातेवाईकांकडे वधु संशोधन सुरू असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

साधारणपणे पंधरावीस वर्षांपूर्वी सोनोग्राफीचा बाजार मोठ्या प्रमाणात तेजीत होता त्यातच वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे या हट्टापायी अनेकांनी चुका केल्या. त्याचे दुष्परिणाम आता दिसत असून आता समाजात मुलांच्या तुलनेत मुलीची संख्या कमी आहे .त्यातच ज्या मुली आहेत त्या चांगल्या शिकलेल्या असल्याने तुलनेने कमी शिकलेल्या बेरोजगार मुलांना कोणी मुलीच देण्यासाठी पुढे येत नाही. पर्यायाने प्रत्येक गावात दहा वीस मुले पंचवीसवी तीसी ओलांडलेले असेच फिरत आहेत. प्रमाण कमी असल्याने मुलींना व मुलीच्या वडिलांना महत्त्व आले आहे.

त्यामुळे त्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. यात मुलीचे कुटुंबीय प्रमुख मागणी करतात. मुलगा सरकारी नोकरीला पाहिजे , मुलगी गावाकडे राहणार नाही, शहरात घर पाहिजे , गावाकडे शेती पाहिजे , आई वडिलाना एकुलता एक पाहिजे ,लग्नाचा खर्च दोघांनी मिळून नाहीतर सर्व तुम्हीच करायचा अशा अटी आता मुलीच्या कुटुंबाच्या बाजूने घातल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी औद्योगिक वसाहतीतील कामगारांची मोठी अडचण झाली आहे, त्यामुळे त्यांना मुली देता का मुली असे म्हणण्याची वेळ आली आहे .

मुलगा तीस वर्षे वयाचा झाला तरी मुलगी मिळत नसल्याने सध्या बायोडाटे पळवणे किंवा स्थळे पळवण्याचे प्रकार घडत आहेत. तर गेल्या दोन वर्षात करोनाच्या नावाखाली चट मंगनी पट शादी, असे म्हणून पटापटी झाल्यावर लग्नही उरकून घेतले जात आहे .

मुलीच्या कमतरतेमुळे व आपल्या गुणवान दिवट्याला लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्यामुळे मुलाचे आईवडील चांगलेच धास्तावले आहेत.

वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे हा बालिश हट्ट आता काही आईवडिलांच्या चांगलाच अंगलट येत आहे. मुलगा काम धंदा करत नाही , रात्रं दिवस फिरतो.आता लग्नही जमत नाही म्हणून अनेक आईवडील डोक्याला हात लावून बसले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या