Wednesday, April 24, 2024
Homeनगरराहुरीतील मुलीच्या अपहरणप्रकरणी सोनईच्या दोन तरूणांवर गुन्हा दाखल

राहुरीतील मुलीच्या अपहरणप्रकरणी सोनईच्या दोन तरूणांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नेवासा तालुक्यातील दोन तरूणांनी राहुरी येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिला पळवून नेले. दि. 10 मार्च रोजी राहुरी तालुक्यातील केंदळ येथून त्या मुलीचे अपहरण करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांसह चोरीच्या घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून राहुरी पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यात पुन्हा गुन्हेगारी वाढली असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहते. दि. 10 मार्च रोजी सकाळी राहुरी तालुक्यातील केंदळ येथून त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. अपहरण करणारे हे नेवासा तालुक्यातील आहेत. त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी एका आरोपीला फोन केला, तेव्हा तो म्हणाला तुला काय करायचे ते कर, मी घाबरत नाही. असे म्हणून त्याने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ केली. आरोपींनी अज्ञात कारणासाठी आपल्या मुलीचे अपहरण केले. याची खात्री झाल्यानंतर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल भाऊसाहेब काकडे व रितेश भाऊसाहेब काकडे दोघे रा. सोनई, ता. नेवासा यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार महादेव शिंदे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या