Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदिंडोरी : मोहाडीत युवतीची आत्महत्या

दिंडोरी : मोहाडीत युवतीची आत्महत्या

दिंडोरी । Dindori

मोहाडी ता. दिंडोरी येथील थोरात विद्यालयात सहावीत शिकत असलेल्या 12 वर्षीय भगवती सतीश पाटील या विद्यार्थीनीने व्यंगाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

- Advertisement -

बुधवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. सतीश पाटील यांचा कटलरीचा व्यवसाय असल्याने आई-वडील गुरुवारी घराबाहेर गेले असताना भगवतीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. जन्मताच भगवतीचे ओठ चिरलेले होते.

शस्त्रक्रिया करुन देखील पडजिभेचा तिला त्रास होत होता. त्यामुळे बोलताना तोतरे बोलायची. या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली अशी नोंद मोहाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या