Thursday, April 25, 2024
Homeनगरराष्ट्रवादीतील संकुचीत विचारांमुळे पक्ष सोडला

राष्ट्रवादीतील संकुचीत विचारांमुळे पक्ष सोडला

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

देशाचे नेते शरदचंद्र पवार हे ग्रेटचआहेत. मात्र खालच्या यंत्रणेने राष्ट्रवादी पक्षाचा घात केला आहे. पक्ष कसा वाढणार नाही असा संकुचित विचार राष्ट्रवादी मधीलच काही जणांनी केला असल्याने आपण मॉडेल राज्य करणारा तेलंगणा चे मुख्यमंत्री के.सी आर यांची ध्येय धोरणे पाहून भविष्यात राज्याचा शाश्वत विकास करणारा पक्ष असणार्‍या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला असल्याचे घन:श्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले आणि मागील विधानसभेत निसटता पराभव झालेले श्रीगोंदा येथिल घन:श्याम शेलार यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. त्यांनी याबाबत भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी टिळक भोस, संजय आनंदकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, राष्ट्रवादी हा पक्ष संकुचित विचार करणार्‍या काही नेत्यामुळे वाढत नव्हता.

तसेच जिल्हा बँकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी ची सत्ता असताना बँकेत भाजपच्या ताब्यात गेली आहे. या सर्व प्रकारामुळे आपण भविष्यात सक्षम पर्याय असलेले भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात येणार्‍या विधानसभेत याच पक्षाची सत्ता येणार आहे. केसीआर यांनी काही वर्षांत तेलगणा हे राज्य मॉडेल केले आहे. तेथील सिंचन योजना, शेतकरी, महिला, मध्यमवर्गासाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे या राज्याचा विकास झपाट्याने झाला आहे.आपल्या राज्यात देखील शेतकर्‍यांना जनतेला या पक्षाची माहिती होत आहे. हाच पक्ष सत्तेत येणार आहे. असे शेलार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या