Friday, April 26, 2024
Homeनाशिकमैत्री असावी तर अशी; वयाची सत्तरी पार केलेल्या मित्रांची भरली शाळा

मैत्री असावी तर अशी; वयाची सत्तरी पार केलेल्या मित्रांची भरली शाळा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिथे मन जुळलेली असतात, विचारांची देवाणघेवाण नियमित सुरु असतो तशी मैत्री (Friendship) आयुष्यभर पुरून उरते. वयाची सत्तरी पार केलेल्या या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा (School) भरली. आयुष्याच्या वाटेवर शाळेच्या या आठवणीत सर्वच अगदी दंग झाले होते…

- Advertisement -

सिन्नर (Sinnar) येथे शेठ ब. ना. सारडा विद्यालयातील 1967 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी ही मैत्री व प्रेम वयाच्या सत्तरीतही अबाधित ठेवलेले दिसून आले. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आधुनिक काळाच्या बरोबरीने या सर्वांनी 54 वर्षांत मुंबई, पुणे, नाशिकसह आणखी इतर शहरांत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले. यातले अनेकजन सिन्नरमध्येच आहेत. या सवंगड्यांचे हे तिसरे संमेलन अगदी उत्साहात पार पडले.

उद्योजक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांच्या संकल्पनेतून हा स्नेहमेळावा पार पडला. याप्रसंगी सर्व मित्र परिवारात तेच प्रेम, स्नेह व जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवनात पुन्हा लहान होऊन रममाण झाले.

सिन्नर येथील चंद्रकांत इंगळे, रमण सारडा, प्रमोद कुलकर्णी, ललित सांगळे, राजाभाऊ गुजराथी, अशोक गवळी, सुरेश काळे, दिनकर खर्डे यांनी पुढाकार घेतला. एकमेकांची ख्याली खुशाली विचारत, आपल्याबाबत, माहिती घेत ही मंडळी अंताक्षरी संगीत खुर्ची, कथेतील धमाल अशा विविध खेळत रमली होती.

ही मंडळी आज आपलं वय विसरून कधी लहान झाली समजलंच नाही. यावेळी शोभना कुलकर्णी यांनी कविता ऐकवल्या. एक दिवसाच्या कार्यक्रमात सर्वजण विद्यार्थी झाले होते. ज्यांच्यामुळे आज हा योग जुळून आला अशा अशोक कटारिया यांचे सर्व मित्रांनी आभार मानले. दुरावलेले मित्र तर एकत्र आले पण त्यांना निरोप देताना अनेकांचा कंठ दाटून आला. यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या