Thursday, April 25, 2024
Homeनगरगौराई महालक्ष्मीही ‘लॉकडाऊन’

गौराई महालक्ष्मीही ‘लॉकडाऊन’

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सध्या करोनामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या कालावधीत देशातील सर्व धार्मिक स्थळांसह मंदिरे बंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्या पार्श्वभूमीवर गौरी महालक्ष्मी बसवताना आरस साकारण्यात आले. महालक्ष्मी मंदिराचा बंदिस्त देखावा श्रीरामपुरात साकारला आहे. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेली मंदिराची जणू काही प्रतिकृतीच दिसत आहे. असा हा नाविन्यपूर्ण देखावा आकर्षण ठरला.

श्रीरामपूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सौ. स्वाती संजय छल्लारे यांच्या निवासस्थानी गौरी गणेशोत्सवानिमित्त आगळे-वेगळे आणि समाज प्रबोधनावर देखावे साकार केले जातात. जेष्ठा गौरी निमित्त कल्पक व नाविन्यपूर्ण देखावे साकारणार्‍या सौ.स्वाती संजय छल्लारे यांच्या निवासस्थानी यावर्षी महालक्ष्मीचे बंदीस्त मंदिर हा देखावा साकारण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या