Friday, April 26, 2024
Homeनाशिकवडाळा नाका येथील संजरी नगरमध्ये गॅस टाकीचा स्फोट

वडाळा नाका येथील संजरी नगरमध्ये गॅस टाकीचा स्फोट

जुने नाशिक । Nashik

वडाळा नाका भागातील संजरी नगर येथे एका घरात गॅस टाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये आठ जण जखमी असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील संजरी अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रमांक सात येथे रात्री सव्वा अकराच्या सुमारास गॅस टाकीचा स्फोट झाला. यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल होत जखमींना बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या स्फोटात घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या