कचरा वेचणार्‍या महिलांना मनपा देणार रोजगार

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात कचरा वेचणार्‍या महिलांना मनपा रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी दिले. आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिनानिमित्त कचरा वेचणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे उपस्थित होते.

1 मार्च हा आंतरराष्ट्रीय कचरावेचक दिन म्हणून साजरा केला जातो. अखिल भारतीय कचरावेचक संघटनाकृत कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायत संघटनेच्यावतीने नगर शहरात कचरा वेचणार्‍या महिलांचा सन्मान करून चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त गोरे म्हणाले, कचरावेचक महिला नगर शहरामध्ये स्वच्छतेबाबत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी आता मनपा घेणार आहे. तसेच या महिला काम करत असताना त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी मनपाच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी दुल्हनबाई गायकवाड, इंदुबाई कांबळे, सुभद्राबाई उल्हारे, बापू चाखले, कालिंदा धाडगे, अलकाबाई काळुंखे, लताबाई साबळे आदी उपस्थित होत्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *