Friday, April 26, 2024
Homeनाशिकगॅरेज चालकाचा धारदार हत्याराने वार करून खून; चारचाकीही पळवली

गॅरेज चालकाचा धारदार हत्याराने वार करून खून; चारचाकीही पळवली

इंदिरानगर | वार्ताहर

वडाळा पाथर्डी रस्त्यावर गॅरेज चालकाचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे…

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र राम पराग निषाद (वय ४० मूळचा उत्तर प्रदेश, असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

वडाळा पाथर्डी रस्त्यावरील मेट्रो झोन समोर श्रीजी प्लाझा अपार्टमेंट लगत श्री गुरुकृपा गॅरेज असुन त्या ठिकाणी चार चाकी वाहने दुरुस्ती व वॉशिंग करण्यात येतात. गुरुवार (दि १२) रोजी नेहमीप्रमाणे सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास आकाश पवार गॅरेजमध्ये कामासाठी आला होता.

त्याने दरवाजा उघडून आत आला असता याठिकाणी मोबाईल तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. तेथून तो पुढे गेला असता गॅरेज चालक निषाद हा मृत्यअवस्थेत पडलेला आढळून आला.

त्यांनी तातडीने गॅरेजचे भागीदार तंबी व शेजारील दुकानदारांना व इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, यांनी पाहणी केली निषाद याचा बुधवार (दि ११) ते रात्री साडेआठ ते गुरुवार (दि १२) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने डोक्यात हत्याराने वार करून खून केल्याचे समोर आले.

याप्रकरणी मृत व्यक्ती यांचा भागीदार मुरूवान तंबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत

आरोपींनी गॅरेजमधील वरणा नावाचे चार चाकी वाहन चोरून नेल्याचे उघडीस आले आहे. वाहन चोरण्याच्या उद्देश की, आर्थिक कारणाने खून करण्यात आला आहे. याबाबत पोलिस तपास करीत आहेत. तसेच आरोपीच्या शोधासाठी शहरातील रस्त्यावरील आणि शहराच्या बाहेर जाणारे टोलनाक्यावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या