Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या१५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

१५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

मुंबई | Mumbai

येथील लोअर परळ (Lower Parel) येथे एका १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार (Torture) झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात (N.M.Joshi Marg Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वरळी (Worli) येथील १५ वर्षांच्या तक्रारदार मुलीचे (Girl)१६ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. गुरूवारी पीडित मुलगी वरळीतील जांबोरी मैदान परिसरात (Jamboree Grounds Area) फिरत होती. तेथून घरी जात असताना मुलीचा प्रियकर व त्याचा मित्र दुचाकीवरून तेथे आले.

त्यावेळी आरोपी प्रियकराने तिला सोबत येण्यास सांगितले. त्यानंतर दुचाकीवर बसवून आरोपीने पीडित मुलीला त्याच्या मित्राच्या खोलीवर नेले. खोलीचा मालक मित्र व पीडित मुलीच्या प्रियकराने पोटमाळ्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी खोलीमध्ये त्याचे इतर चार मित्रही उपस्थित होते. त्यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (Police) सहा जणांविरोधात गुन्हा दाखला केला असून त्यातील तीन आरोपींना अटक केली आहे. तर आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तसेच प्रौढ आरोपींना (Accused) कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या