Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकगंगापूर कॅनाल 15 नंबर चारीचा निधी गेला कुठे?

गंगापूर कॅनाल 15 नंबर चारीचा निधी गेला कुठे?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गंगापूर कॅनाल (Gangapur Canal) 15 नबंर चारीचा निधी गेला कुठे? याचा जाब सोमवारी शेतकरी वर्गाचे शिष्टमंडळ माजी आमदार अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य दिपक शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पाटबंधारे विभागला विचारणार आहे….

- Advertisement -

नाशिक – निफाड- गंगापूर कालवा (Nashik Nifad Gangapur canal), सैय्यद पिंप्री (Saiyyad Pimpri) व खेरवाडी (Kherwadi) परिसरातील चारी नबंर 15 याची दुरावस्था झाली आहे. पाटबंंधारे विभागाला शासनाचा निधी मिळवुनही काम झाली नाहीत. अशा तक्रारी परीसरातील शेतकर्‍यांनी केल्या आहेत.

15 नबरं चारी वरील शेतकरी शेतीची टॉमेटो, द्राक्षाचे नुकसान होते, त्यामुळे पाणी बंद करतात. या चारीचे ज्या ठिकाणाहून पाणी गळती होते, तेथे अर्धा किलोमीटर परिसरात चारीचे काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे.

खेरवाडी (Kherwadi) परिसरातील 1000 एकर द्राक्ष फळ बागेचे क्षेत्र आहे. त्या परिसरात पावसाळ्यातही जर चारीला पाणी येत नसेल तर उन्हाळ्यात काय परिस्थीत असेल याचा विचार केला जात नाही.

आज 100 ते 150 शेतकरी येथे जमले होते. गंगापूर कॅनॉल (Gangapur Canal) 15 नबंर चारी आधिकारी जाब विचारणासाठी जिल्हा परिषद सदस्य दिपक शिरसाठ, शिवसेना नाशिक उपहानगर प्रमुख सुनील जाधव, माजी सरपंच सोपान संगमनेरे, प्रभाकर बुरके, पोलीस पाटील रामदास आवारे , रमेश संगमनेरे, रमन संगमनेरे, बाबाजी संगमनेरे, विलास भोसले, विलास आडके, रमेश आडके,

विश्वास संगमनेरे, दशरथ संगमनेरे , कैलास संगमनेरे , नारायण संगमनेरे, दत्तात्रय संगमनेरे, रामनाथ संगमनेरे, पप्पू उगले, संदीप जाधव,सुनील जाधव रामकृष्ण लगड, आदी शेतकरी उपस्थित होते.

सोमवारी शेतकरीवर्गाचे शिष्टमंडळ माजी आमदार अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य दिपक शिरसाठ यांच्यासह नाशिक पाटबंधारे विभागला जाब विचारणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या