Thursday, April 25, 2024
Homeनाशिकफार्मसीच्या विद्यार्थ्याचा आनंदवल्ली परिसरात खून

फार्मसीच्या विद्यार्थ्याचा आनंदवल्ली परिसरात खून

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरात आज पहाटेला नाशिक पुणे रोडवर खुनाची घटना ताजी असतानाच आणखी दुसरी खूनाची घटना गंगापूर रोड परिसरात उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे….

- Advertisement -

गंगापूर रोडवरील आनंदवली शिवारातील बेंडकुळे नगर येथे विपुल खैर (vipul khair) नामक युवकाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विपुल हा अभोणा येथे डी फार्मसीचे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, विपुल खैर हा डिजीपी नगर येथील रहिवासी आहे. तो अभोणा येथे डी फार्मसीचे शिक्षण घेत होता. काही नागरीक फिरत असताना त्यांना दुचाकी व एक बॅग पडलेली दिसली होती.

थोड्या अंतरावर पाहिले असता निर्जनस्थळी एक मृतदेह असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. यानंतर काल (दि १९) रोजी गंगापूर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, मृतदेहाच्या अंगावर खरचटल्याच्या खुना मिळून आल्या आहेत. पोलिसांनी संबंधित युवकाच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे. तो अभोणा येथे गेला होता. या ठिकाणी कसा आला यावर कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून यामध्ये या युवकाचा खून झाल्याचे अहवाल नुसार स्पष्ट झाले आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या