Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेश'या' देशात उभारलं जातंय कार, रस्ते विरहित पर्यावरणपूरक शहर

‘या’ देशात उभारलं जातंय कार, रस्ते विरहित पर्यावरणपूरक शहर

दिल्ली | Delhi

जगातलं तेल संपल्यानंतर काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या दृष्टीने सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे पर्यावरणपूरक असे एक नवीन शहर वसवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

निओम (NEOM) प्रकल्पांतर्गत सुमारे १७० कि.मी. लांबीमध्ये शहर वसवण्याची प्रिन्सची योजना आहे. या प्रकल्पाला ‘द लाइन’ असे नाव देण्यात आले आहे. निओम शहर तयार करून तेलाने संपन्न असलेला देश सौदी अरेबिया स्वत: साठी विना तेलाचे भविष्य शोधत आहे. या शहराच्या बांधकामाला यंदाच्या पहिल्या तिमाहीत सुरुवात होईल. टीव्हीच्या माध्यमातून प्रिन्सने या प्रकल्पाची माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे हे शहर लाल समुद्राच्या काठावर विकसित केले गेले आहे.

सौदी अरेबियातील निओम या नवीन शहरात दहा लाख लोक राहू शकतील अशी व्यवस्था असणार आहे. यामध्ये शाळा, आरोग्य केंद्रे आणि भरपूर झाडे यासारख्या सुविधा असतील. तेथे ३,८०,००० लोकांना रोजगार निर्मिती होईल. प्रिन्सने सांगितले आहे की, या शहराच्या पायाभूत सुविधांसाठी १००-२०० अब्ज डॉलर्स खर्च येईल. प्रिन्स म्हणाले की निओम शहरात हाय-स्पीड सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार केली जाईल. या शहराच्या विकासात आर्टिफिशिअल इंटेलिजंस महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. हे शहर १०० टक्के स्वच्छ उर्जाद्वारे चालविले जाईल आणि इथल्या रहिवाशांना प्रदूषणमुक्त, आरोग्यदायी आणि अधिक योग्य वातावरण प्रदान करेल. निओम शहर २६,५०० चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरले जाईल आणि त्याच्या सीमा जॉर्डन आणि इजिप्तला स्पर्श करतील. २०१७ मध्ये निओम तयार करण्याची घोषणा केली गेली होती. एका अंदाजानुसार २०३० पर्यंत हे शहर सौदी अरेबियाच्या जीडीपीमध्ये सुमारे ४८ अब्ज डॉलर्सचे योगदान देईल.

‘नियोम’ टेक्नोलॉजिकल आणि काही अन्य उद्योगांचे केंद्र असेल. या प्रकल्पावरुन वादही झाला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आला, तर त्यात अपेक्षित गुंतवणूक होईल का? असा विश्लेषकांचा सवाल आहे. पुढच्या १० वर्षात नियोममध्ये सौदी सरकार, पीआयएफ आणि स्थानिक, जागतिक गुंतवणूदार ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करतील असे क्राऊन प्रिन्सने पत्रकारांना सांगितले.

सौदी अरेबिया जगातील अग्रगण्य कच्च्या तेलाची निर्यात करणारा देश आहे आणि सर्वाधिक प्रदूषण करणार्‍या देशांमध्येही समाविष्टतो आहे. आता निओम शहर तयार करून प्रिन्स विनातेलाच्या भविष्याचा शोध घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या