Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशPetrol-Disel : केंद्रानंतर या १० राज्यांनी केली पेट्रोल, डिझेलवर कर कपात; जाणून...

Petrol-Disel : केंद्रानंतर या १० राज्यांनी केली पेट्रोल, डिझेलवर कर कपात; जाणून घ्या आजचे दर

दिल्ली | Delhi

केंद्र सकारने ऐन दिवाळीत महागाईपासून सामान्यांना दिलासा देण्याचा ( excise duty on petrol and diesel ) प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरी उत्पादन शुल्कात ५ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपये कपात केली आहे.

- Advertisement -

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये पेट्रोल (Petrol ) डिझेलचे (Diesel) दर अनुक्रमे १०३.९७ रूपये आणि ८६.६७ रूपये प्रति लीटर असून मुंबई (Mumbai) मध्ये पेट्रोल सध्या १०९.९८ रूपये आणि डिझेल ९४.१४ रूपये प्रतिलीटर इतके आहे. कोलकातामध्ये (Kolkata) पट्रोल आता १०४.६७ आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर आहे. याव्यतिरिक्त चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचे दर १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर आहे.

केंद्राच्या निर्णयानंतर उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड, असम, मणिपूर, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनीही पेट्रोल-डिझेल दरात (Petrol Diesel Price) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांन घेतलेल्या निर्णयानुसार पेट्रोल-डिझेलवर लागणारा वॅट (VAT) कमी करण्याची घोषणा केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या