Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशइंधनदर भडकणार नाही

इंधनदर भडकणार नाही

नवी दिल्ली | New Delhi

रशिया- युक्रेन युद्ध भडकल्यानंतर कच्च्या तेलांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात इंधन दर वाढीसोबत महागाई भडकण्याचा अंदाज असताना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. तेलाच्या किंमती आणि त्याचा पुरवठा सध्या नियंत्रणात असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण जागतिक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत.

- Advertisement -

कच्च्या तेलाचा पुरवठ्यामध्ये अडचणी येणार नाही. यासाठी आवश्यक ती पाऊलं उचलली जात आहेत. स्थिर किंमतीवर नागरिकांना हा पुरवठा कायम राहिल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. भविष्यकाळात जर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये अडचणी आल्या तर केंद्र सरकार आपल्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधील तेल बाजारात आणेल. त्यामुळे बाजारातील अस्थिरता होणार नाही तसेच क्रुड ऑईलच्या किंमतीवरही नियंत्रण राहिल, असं पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या