दिव्यांग प्रवाश्यांना सिटीलिंककडून मोफत पास

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनीधी | Nashik

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (Nashik Mahanagar Transport Corporation Ltd.) अर्थातच सिटीलिंकच्या (Citylink) वतीने मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्ति तसेच शहराबाहेरील परंतु

शिक्षणासाठी (education) महापालिका हद्दीत राहत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना (disabilities Students) १ नोव्हेंबर पासून मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्यासाठी दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ पासून दिव्यांग व्यक्तींना मोफत कार्ड (Free card) काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, त्यानुसार १४ नोव्हेंबर पर्यंत एकूण १७३३ मोफत कार्ड दिव्यांग प्रवाश्यांना (disabled passengers) देण्यात आले.

यामध्ये १५०५ दिव्यांग तर २२८ अंध प्रवाशांचा समावेश आहे. दिव्यांग प्रवाशांना (disabled passengers) मोफत कार्ड उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू असून ज्या दिव्यांग प्रवाश्यांना मोफत कार्ड काढावयाचे आहे, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सिटीलिंक मुख्यालयातील (Citylink Headquarter) पास केंद्र (pass center) येथे जाऊन पास घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *