Wednesday, May 8, 2024
Homeजळगावऑनलाईन ट्रेडींगच्या नावाखाली फसवणुक करणार ठग गजाआड

ऑनलाईन ट्रेडींगच्या नावाखाली फसवणुक करणार ठग गजाआड

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

ऑनलाईन ट्रेडींगमध्ये गुंतवणुक करुन डबल नफ्याचे अमिष दाखवून एकाला साडेनऊ लाखांचा गंडा घालणार्‍या विजय दयाभाई कलसरीया उर्फ अजय (वय-33, रा. अम्रेली गुजरात) या ठगाच्या सायबर पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील भावनगर येथून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 5 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

- Advertisement -

रावेर येथील एकाला ऑनलाईन ट्रेडींगमध्ये गुंतवणुक केल्यास डबल नफा होईल असे अमिष दाखवून त्याची 9 लाख 30 हजारामध्ये ऑनलाईन गंडविल्याची घटना दि. 14 डिसेंबर 2022 ते दि. 1 एप्रिल 2023 दरम्यान घडली होती. फसवणुक झाल्याचे कळताच त्या इसमाने सायबर पोलिसात धाव घेत त्यांच्यासमोर हकीकत कथन केली होती. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना सायबर पोलिसांच्या पथकाने ठगाने पाठविलेले व्हाट्सअपचे मॅसेज, कॉल यासह रावेर येथील इसमाने जे ऑनलाईन ट्रेडींग अ‍ॅप्लिकेशन इंन्टॉल केले होते. त्यासह बँकेतील माहितीचे विश्लेशन करुन आरोपी निष्पन्न केला.

भावनगरातून आवळल्या मुसक्या

संशयित आरोपी गुजरात राज्यातील भावनगरातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने विजय दयाभाई कलसरीया उर्फ अजय (वय-33, रा. अम्रेली गुजरात) याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून फसवणुकीच्या रकमेतील 5 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली.

या पथकाची कामगिरी

ही कामगिरी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, पोउनि दिगंबर थोरात, पोहेकॉ प्रवीण वाघ, पोना दिलीप चिंचोले, पोकॉ गौरव पाटील संदीप साळवे, ईश्वर पाटील यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या