Wednesday, April 24, 2024
Homeजळगावपीएचडीच्या नावाखाली प्राध्यापिकेला गंडा

पीएचडीच्या नावाखाली प्राध्यापिकेला गंडा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील एका नामांकीत महाविद्यालयातील प्राध्यापिकेला (college professor) पीएचडी (PhD) करण्याच्या नावाखाली त्यांनी बँकेत (bank) करुन ठेवलेली 5 लाख हजारांची फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) परस्पर तोडून (mutual disconnection) ती रक्कम ऑनलाईन(Extended online) लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

शहरातील एका महाविद्यालयात पुनम शांताराम साळुंखे या प्राध्यापिका म्हणून नोकरीस आहे. दि. 9 नोव्हेंबरला त्यांना अनोखळी क्रमांकावरुन कॉल आला. समोरील व्यक्तीने मी त्या नोकरी करीत असलेल्या कॉलेजमधूनच बोलत असल्याचे सांगून तुम्हाला पीएचडी करायची आहे का ? असे त्याने विचारले. प्राध्यापिका महिलेने त्यांना होकार दिल्यानंतर त्या व्यक्तीने महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅडमीशनसाठीची डिटेल्स पाठविले. तसेच अ‍ॅडमीशनसाठी 17 हजार रुपये फि असून त्यासाठी एका बँकेची लिंक देखील दिली होती.

प्राध्यापिकेला त्या व्यक्तीवर विश्वास झाल्याने त्यांनी नेट बँकींगद्वारे त्यावर 17 हजार रुपये फी भरली. त्यानंतर समोरील व्यक्तीने पुन्हा फोन करुन तुम्हाला पैसे भरल्याची पावती हवी असल्यास तुम्हाला आणखी 28 हजार रुपये भरावे लागलीत असले सांगितले. त्यानुसार प्राध्यापिकेने पुन्हा ऑनलाईन पद्धतीने 28 हजार रुपये ट्रान्सफर केले.

मामांकडून पैसे घेवून भरली फी

प्राध्यापिकेने 28 हजार रुपये ट्रान्सफर केल्यानंतर संबंधित व्यक्तीने लगेच त्यांना पावतीसाठी 16 हजार रुपये भरण्यास सांगितले. परंतु त्यांच्याकडे पैसे नसल्याने महिलेने त्यांचे मामा यांच्याकडून पीएचडीची फि भरायची असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे मागवून घेत ते पैसे त्या लिंकवर पाठविले.

एफडी तोडून ट्रान्सफर केली रक्कम

गुरुवारी प्राध्यापिका आपला मोबाईल पाहत असतांना त्यांना आयसीआय बँकेचे काही मॅसेज दिसले. त्यांनी ते मॅसेज बघताच त्यांच्या बँक खात्यातून 5 लाखांची एफडी कोणीतरी विनापरवानगी तोडून ते पैसे ऑनलाईन ट्रान्सफर केल्याचे समजले. त्यांनी लगेच बँकेत तक्रार दिली. आपली फसवणुक झाल्याचे समजताच सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या