Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशफ्रान्सच्या चर्चमध्ये हल्ला, तीन ठार

फ्रान्सच्या चर्चमध्ये हल्ला, तीन ठार

पॅरिस –

फ्रान्समधील नाईस या शहरात एका हल्लेखोराने आज (29 ऑक्टोबर) चाकूने भोसकून तीन जणांना मारले अशी माहिती

- Advertisement -

प्रशासनाने दिली. फ्रान्समध्ये मागील दोन महिन्यांत अशा प्रकारचा झालेला हा तिसरा हल्ला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे धडे देणार्‍या शिक्षकाचा मुस्लिम कट्टरवाद्याकडून गळा चिरल्याच्या घटनेनंतर झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण फ्रान्स हादरले आहे. नॉत्रे देम चर्चमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत हल्लेखोर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी फ्रान्सच्या दहशतवादविरोधी कार्यालयाने तपास सुरू केला आहे. अलिकडील काळात अशाच प्रकारचा झालेला हा तिसरा हल्ला असल्याचे कार्यालयाने सांगितले. चाकूहल्ला करताना हल्लेखोर अल्लाहो अकबर अशा सातत्याने घोषणा देत होता. जखमी झाल्यानंतरही त्याच्या घोषणा थांबल्या नव्हत्या, अशी माहिती नाईसचे महापौर ख्रिश्चन एस्ट्रोसी यांनी दिली. या हल्ल्यात तीन जण ठार झाले. त्यापैकी दोन जण चर्चमध्ये, तर पळ काढण्याच्या प्रयत्नातील एक जण ठार झाला, असेही त्यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच फ्रान्सच्या पंतप्रधानांनी तातडीने आपात्कालीन केंद्रात धाव घेऊन नाईस शहरातील हल्ल्याची माहिती घेतली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हल्ल्याची माहिती मिळताच, तातडीने नाईस शहराकडे रवाना झाले आहेत.

सतर्कतेचा इशारा आणिबाणी पातळीवर

या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सतर्कतेचा इशारा आणिबाणीच्या स्तरावर नेण्यात येईल, अशी माहिती फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी खासदारांना दिली. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंग्यचित्र चार्ली हेब्दोमध्ये पुन्हा प्रकाशित करण्यात आल्याने फ्रान्समध्ये तणाव वाढला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या