Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकबारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी

बारामतीहून मागविणार ४ हजार ३८५ क्विंटल साखर; तुटवडा टाळण्यासाठी काळजी

नाशिक । प्रतिनिधी

करोना संकट पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. बारामती येथुन 4 हजार 385 क्विंटल साखर मागविण्यात येणार आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातून डाळी व गोडेतेल मागविण्यात येणार आहे.

- Advertisement -

तुटवडा निर्माण होऊन वस्तूंची साठेबाजी होऊन काळाबाजार होणार नाही याची पुरेपुर काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.
राज्यासह देशभरात येत्या १५ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन आहे. करोना संसर्ग टाऴण्यासाठी लाॅकडाऊनचा कालावधीत वाढ होऊ शकते असे बोलले जात आहे.

सरकारने देखील त्या अनुषंगाने तयारी केली असून गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी अंत्योदय व प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्याचे रेशन आगाऊ देण्याचे ठरविले आहे.

तसेच लाॅकडाऊन कालावधीत जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होऊन किंमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर जाऊ नये. यासाठी जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

साखर, खाद्य तेल, डाळी याची कमतरता भासणार नाही, यासाठी नियोजन केले आहे. बारामती येथुन 4 हजार 385 क्विंटल साखर मागविण्याबाबत संबधित साखर कारखान्याचे व्यवस्थापन व ट्रान्सपोर्टर यांचेशी संपर्क साधून नियोजन करण्यात आले आहे.

तसेच सर्व तहसिलदारांनी एप्रिलसाठी केलेल्या धान्य वाटपाचे नियोजन व परवाने वाटपाचा आढावा घेण्यात आला आहे. तहसीलदारांना आवश्यक त्या संशयित ठिकाणी धाडी टाकून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्व तालुक्यांना एप्रिलमध्ये मनमाड येथुन धान्य वाटपाचे नियोजन करण्यात आले असुन त्याबाबत संबधित व्यवस्थपकांशी सातत्याने संपर्क करण्यात येत आहे.

साठेबाजी वाढू नये यासाठी धान्य वितरण अधिकारी यांना शहरातील दुकानांची तपासणीचे सनियंत्रण करण्याचे आदेश दिले असून मालेगांव व पेठ येथील कामगारांना धान्य वाटप करण्यासाठी संबधित पुरवठा ‍निरीक्षक यांचेमार्फत खात्री करुन त्यांना स्वयंसेवी संस्थामार्फत धान्य वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत.

घाऊक व किरकोळ व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधुन ठाणे, धुळे, लातुर, अकोलa येथून डाळी, गोडेतेल माविण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या