Saturday, April 27, 2024
HomeनाशिकNashik Crime News : 'त्या' युवकाच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक

Nashik Crime News : ‘त्या’ युवकाच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

उपनगर पोलीस स्टेशनच्या (Upnagar Police Station) हद्दीत काल (दि.२२ जुलै) रोजी रात्री आठ वाजता एका युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला (Sharp Weapon) करून खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज उपनगर पोलिसांनी या खून (Murder) प्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

Amit Thackeray : समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर नेमकं काय घडलं? अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या बोधलेनगर येथे एका दुकानात कामाला असलेल्या तुषार एकनाथ चौरे या युवकावर (Youth) चार जणांच्या टोळक्याने शस्त्राने वार करून त्याची हत्या केली होती. चौरे हा दुकानातील काम आटोपून आपल्या दुचाकी गाडीवर घरी जात असताना पाठीमागून दुचाकी गाडीवर आलेल्या चार जणांनी चौरे याच्या गाडीला लाथ मारली. त्यानंतर चौरे खाली पडल्याने या टोळक्याने चौरे याच्यावर सशस्त्र हल्ला केला. त्यावेळी या हल्ल्यात (Attack) चौरे गंभीर जखमी झाल्याने मृत पावला.

उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करणार? संजय राऊत यांच्यासोबतच्या मुलाखतीचा टिझर रिलीज… पाहा VIDEO

दरम्यान, सदर हल्लेखोरांनी चौरे व त्याच्या जोडीदारांचा पाठलाग केला. मात्र, हल्लेखोरांच्या हातात शस्त्र असल्याने दोघेजण वेगवेगळ्या दिशेला पळाले. यानंतर सर्व हल्लेखोर चौरे यांच्या पाठीमागे धावले व त्यांनी बोधलेनगर परिसरात (Bodhlenagar Area) असलेल्या एका दुकानाजवळ चौरे यास गाठून त्याच्यावर सपासप वार करत त्याला ठार केले. या घटनेनंतर चौरे याचा मित्र सचिन गणपत गरड आणि त्याचा मित्र घटनास्थळी आला असता चौरे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांची…”; पंतप्रधान मोदींनी केले मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक

त्यानंतर सदर घटनेची माहिती उपनगर पोलिसांना (Upnagar Police) समजताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. याप्रकरणी सचिन गरड याने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हल्लेखोर सुलतान मुक्तार शेख, रोहित पगारे, शुभम खांडरे, अमन शेख यांना अटक (Arrested) केली आहे. तसेच सदरचा हल्ला प्रेम प्रकरणावरून झाला असल्याचे समजते.

अखेर ठरलं! अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने उरकला साखरपुडा; ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात

उपनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

गेल्या काही महिन्यापासून उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. एक ते दीड महिन्यापूर्वीच जेलरोड परिसरातील लोखंडे मळा येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसून हल्लेखोरांनी लुटमार करून तिची हत्या केली होती. या गुन्ह्याचा तपास अद्यापही लागलेला नाही. त्याचप्रमाणे उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सातत्याने हाणामारीचे आणि चोरीचे प्रकार घडत असतात परंतु पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष असते. तर वाढत्या गुन्हेगारीमुळे उपनगर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारण्यास कोणताही अधिकारी तयार होत नसतो. त्यातच मोठ्या प्रमाणात उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. याबाबत पोलीस आयुक्तांनीच लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik : मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून समृद्धीच्या टोलची तोडफोड; अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने कार्यकर्ते संतप्त

- Advertisment -

ताज्या बातम्या