Friday, April 26, 2024
Homeधुळेचार लाख 66 हजार 780 नागरिकांना मिळणार मोफत बुस्टर डोस

चार लाख 66 हजार 780 नागरिकांना मिळणार मोफत बुस्टर डोस

धुळे Dhule। प्रतिनिधी

कोरोना महामारीचा (Corona epidemic) सामना करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी (Citizens) बुस्टर डोस घ्यावा (Take a booster dose) यासाठी शासनाकडून कोविड लस अमृत महोत्सव जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत 15 जुलैपासून 18 वर्षावरील नागरिकांना मोफत (Free) बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील चार लाख 66 हजार 780 नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. जे. सी. पाटील (Municipal Health Officer Dr. J. C. Patil) यांनी दिली आहे.

- Advertisement -

पहिले दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांना बुस्टर डोस दिला जातो. डोस कमी पडू नये यासाठी नव्याने डोसची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फ्रंटलाईन वर्कर, हेल्थ केअर वर्कर आणि 60 वर्षावरील ज्येष्ट नागरिकांनाच बुस्टर डोस मोफत दिला जात होता.

इतर सामान्य नागरिकांना हा डोस खासगी केंद्रांवर विकत घ्यावा लागत होता. परंतू आता बुस्टर डोस मोफत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 15 जुलैपासून पुढील 75 दिवस हा डोस नियोजन केंद्रांवर दिला जाणार आहे.

शहरातील ज्या नागरिकांनी पहिला, दुसरा व तिसरा (बुस्टर डोस) राहिला असेल त्यांनी धुळे महापालिकेच्या प्रभातनगर, राऊळवाडी, कृष्णनगर, हजार खोली, नंदीरोड या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे मोफत डोस उपलब्ध आहेत.

18 वर्षापेक्षा अधिक वय असणार्‍या लाभार्थ्यांना धुळे महापालिकेचे आवार, सुभाष नगर, नंदीरोड या ठिकाणी 24 तास कोविड लसीकरण केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या