Friday, April 26, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर तालुक्यातील चार ग्रा.पं. बिनविरोध

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चार ग्रा.पं. बिनविरोध

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

तालुक्यातील 9 ग्रा.पं.च्या 17 जागांंसाठी पोट निवडणूक Grampanchayat Elections जाहीर झाल्या असुन 4 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. मंगळवारी 21 डिसेंबरला फक्त शिवाजीनगर या ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी मतदान होणार असल्याची माहिती तहसीलदार दीपक गिरासे Tehsildar Deepak Girase यांनी दिली.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी येत्या 21 डिसेंबर रोजी मतदानप्रक्रिया तर 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 30 नोव्हें. ते 6 डिसें. पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये सोमनाथ नगर ,आळवंड, आव्हाटे, व होलदार नगर येथील ग्रामस्थांनी एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

तर हरसुल प्रभाग क्र.5 पांडुरंग गोविंद टोपले बिनविरोध झाले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या 17 जागांपैकी 4 ग्रामपंचायतीच्या 4 जागा बिनविरोध, शिवाजीनगर एक जागेसाठी निवडणूक होईल.

अद्याप त्र्यंबक तालुक्यात नऊ ग्रामपंचायतीच्या 12 जागा रिक्त आहेत. मतमोजणी 22 डिसेंबरला होईल. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी सुभाष राउत हे काम पाहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या