Saturday, April 27, 2024
Homeनाशिकबँका चार दिवस बंद! हे आहे कारण

बँका चार दिवस बंद! हे आहे कारण

नाशिक | प्रतिनिधी

खासगीकरणाविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे. येत्या १५ आणि १६ मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक असून सलग चार दिवस सरकारी बँकाचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे….

- Advertisement -

संपात ऑल इंडिया नॅशनलाईज्ड बँक ऑफिसर्स फेडरेशनचे ६८००० सभासद सहभागी हाेणार आहेत. बँकांच्या खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी या क्षेत्रातील नऊ कामगार संघटनांनी संपाची हाक दिली आहे.

तत्पूर्वी १३ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १४ मार्च रोजी रविवार आणि नंतर सोमवार आणि मंगळवार या संपामुळे सलग चार दिवस सरकारी बँकाचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.

काल गुरुवारी महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी हाेती. त्यामुळे ग्राहकांकडे आज शुक्रवार हा एकच दिवस बँक कामे उरकण्यासाठी आहे. या संपात युनायटेड फोरम ऑफ बँक या संघटनेच्या नेतृत्वात नऊ संघटना सहभागी होणार आहेत. ज्यात पाच लाख कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचवण्याचे काम सार्वजनिक क्षेत्रातील बँका करत आहेत. संघटनेचा खासगीकरणाला विरोध आहेच शिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि इतर प्रश्नांबाबत देखील सरकारने तातडीने तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी आहे.

दरम्यान, ए.आय.बी.इ.ए, आयबोक, एन.सी.बी.इ, ए.आय.बी.ओ.ए, बेफी, इन्बेफ, इन्बोक, एन.ओ.बी.डब्लु आणि नोबो या नऊ संघटनांनी युनायटेड फोरम ऑफ बँक या संघटनेच्या नेतृत्वात संपात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे.

त्यामुळे सार्वजनिक बँकिंग व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या संपाबाबत सरकारकडून कोणतीही चर्चा न झाल्याने संप अटळ असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या