Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या'रसना'चे संस्थापक अरिज खंबाटा यांचे निधन

‘रसना’चे संस्थापक अरिज खंबाटा यांचे निधन

नवी दिल्ली | New Delhi

‘रसना’चे संस्थापक अरिज पिरोजशा खंबाटा (Areez Pirojsha Khambatta) यांचे निधन (Passed Away) झाल्याची माहिती रसना ग्रुपने (Rasna Group) दिली आहे. ते ८५ वर्षांचे होते.

- Advertisement -

खंबाटा यांनी १९७० च्या दशकात ‘रसना’ या घरगुती शीतपेयाची निर्मिती केली होती.अल्पावधीच हे शीतपेय (Soft Drinks) लोकप्रिय झाले होते. आज देशभरातील १८ लाख रिटेल दुकांनांसह जगभरातील ६० देशांमध्येही रसनाची विक्री केली जाते. रसना ही आता जगातील सर्वात मोठ्या शीतपेय उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.

दरम्यान, खंबाटा हे बेनेव्होलेंट ट्रस्ट, रसना फाउंडेशन आणि अहमदाबाद पारसी पंचायतसह वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी जरथोस्ती (WAPIZ)चे माजी अध्यक्ष होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या