Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे विद्यापीठाच्या ऑफलाईन परीक्षांचे स्वरूप निश्चित

पुणे विद्यापीठाच्या ऑफलाईन परीक्षांचे स्वरूप निश्चित

सार्वमत

पुणे(प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणार्‍या ऑफलाईन परीक्षांचे स्वरूप विद्यापीठाकडून ठरविण्यात आले असून ही ऑफलाईन परीक्षा 50 गुणांची आणि परीक्षेची वेळ दीड तास असणार आहे, अशी माहिती पुणे विद्यापीठाने दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 31 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे विद्यापीठांच्या परिक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऑफलाईन परीक्षा होणार याबाबत सांगितले होते. आता या परीक्षेचा फॉर्मेट विद्यापीठाकडून ठरवण्यात आला आहे. ऑफलाईन परीक्षेत 50 गुण असतील आणि परीक्षेची वेळ दीड तास असणार आहे, अशी माहिती पुणे विद्यापीठाने दिली आहे.

- Advertisement -

यूजीसीच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्ये घेतल्या जाणार आहेत. परीक्षा घेण्यासाठी पुणे विद्यापीठाने पाच समित्या नेमल्या असून यांच्यामार्फत कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पदवीच्या अंतिम वर्षाचा आणि पदव्युत्तर पदवी द्वितीय वर्षाच्या परिक्षेचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये अभ्यासक्रमातील 30 टक्के भागाचे ई-साहित्यही तयार केले जाणार आहे.

नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी याबाबत परिक्षपत्रक जारी केल होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, विद्यापीठाच्या सर्व परीक्षा लेखी पद्धतीने होणार आहेत. कोणत्याही अभ्यासक्रमाची परीक्षा ऑनलाईन होणार नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप कसे असेल, किती गुणांची परीक्षा असेल हे ठरविण्यासाठी विद्याशाखांच्या समितींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या शिफारशीनुसार निर्णय होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या