Friday, April 26, 2024
Homeजळगावपाटणादेवी अभयारण्यात पहिल्यादाच प्रगणनेत आढळले अस्वल

पाटणादेवी अभयारण्यात पहिल्यादाच प्रगणनेत आढळले अस्वल

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

- Advertisement -

चाळीसगावलगत असलेल्या गौताळा पाटणादेवी औट्रमघाट अभयारण्यातील सोमवार १६ रोजी बुद्ध पौर्णिमेला प्राण्याची गणना करण्यात आली. यात पहिल्यादात पाटणादेवी अभयारण्यात अस्वलाचा आधिवास आढळुन आला, त्याच्या पाऊल खूनासह तो प्रत्यक्षात दिसल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर सात बिबट्यासह इतर वन्यप्राणी आढळुन आल्याने पाटणादेवी अभयारण्यात अजुनही मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा आदिवास असल्याचे सिद्ध झाले आहे.

वनविभागातर्फे बुद्ध पौर्णिमेला सकाळी ९ ते दुसर्‍या दिवशी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान प्रत्यक्ष वन्य प्राणी निरीक्षण करून नोंदी घेण्यात आला. ६ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्यात ४२ कि.मी लांबीचा सह्याद्रीचे पठार असून ८०० ते २००० हेक्टरचे पाटणा, ओढरे, बोढरे, जुनोने असे चार वन कक्ष व पाटणा तसेच बोढरा हे २ वन परिमंडळ असून ५० पाणवठे आहे. वन्यप्राण्यांची संख्या निश्चित करण्यासाठी बुद्ध पौर्णिमेला १२ पाणवठ्यांवर मचाण उभारून प्राण्यांची गणना करण्यता आली. यात या अभयारण्यात पहिल्यादाच अस्वल व त्यांच्या पाऊस खूनाचे निरिक्षण करण्यात आले.

त्याच बरोबर सात ठिकाणी बिबट्या प्रत्यक्षात पाणी पिताना वनकर्मचार्‍यांनी पाहिला. तर मोर , माकडे , रानडुकरे , भेकर , रान मांजर , ससे , उद मांजर , स्वर्गीय नर्तक , कोकीळ , तुईय्या , नाचण , घुबड , सर्प गरुड , धनेश , कोतवाल , अस्वल , कोल्हा, नीलगाय, हरीण, तडस, रानडुक्कर, काळवीट, लांडगा, सायाळ, लांडोर, उदमांजर, मुंगूस या सह एकूण २४ प्रजातीची निरिक्षण करण्यात आले. यात सात बिबट्यासह एकूण ३३२ प्राण्याची आदिवासाची आकडेवारी निश्‍चित करण्यात आलेली आहे. प्राणी गणनेसाठी संयोजक म्हणून वन्यजीव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई , वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वनपाल संजय जाधव , श्री . गवळी , वनरक्षक रहीम तडवी, अजय महिरे , दीपक राजपूत , वनमजुर नागो आगीवले , श्री नवश्याराम , मोहन पवार , बापू अगोणे , श्री . बाबू , चाळीसगव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षण संजयर ठेंगे यांच्या वनकर्मचारी उपस्थित होते.

निरिक्षणातील प्राण्याची संख्या-

अस्वल १, बिबट ७, कोल्हे १, मोर ६२, भेकर ३, काळविट २, नीलगाय २२, रानमांजर १, उदमांजर २, रान डुक्कर १०८, माकड ७३, ससा २५, बडक ४, खार २, किंग फिशर १, बुलबुल २, सालुंखी ३, मुंगुुस ५, धनेश ३, सर्प गरुड १, फॅटेल १, आपोरा १, स्वगीय नर्तक १, कुकू १ असे एकूण ३३२ प्राण्याची गणना करण्यात आली आहे.

‘ पाटणादेवी अभयाअरण्यात पहिल्यादाच प्राणीगणनेत अस्वल आढळुन आले आहे. तसेच यापूर्वी देखील ते ग्रामस्थंाना दिसून होते. त्याच्या पाऊल खूणा देखील आढळुन आल्या आहेत ‘.——वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई

- Advertisment -

ताज्या बातम्या