पावसाअभावी जिल्ह्यात भीषण चारा टंचाई; चाऱ्यासाठी ऊसाच्या मागणीत वाढ

jalgaon-digital
2 Min Read

नैताळे | वार्ताहर | Naitale

ऑगस्ट महिना संपत आला असून अजूनही नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने अनेक तालुक्यांमध्ये खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पशुपालकांनी साठवून ठेवलेला कोरडा चारा संपला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात घास व गवत भरण्यासाठी सुद्धा पाणी न राहिल्याने निफाड तालुक्यातून चाऱ्यासाठी ऊसाला मागणी वाढल्याचे चित्र आहे…

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी खरीप हंगामातील मका, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके पावसाअभावी करपू लागली आहे.

Actress Seema Dev : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याच्या टंचाईसह चारा टंचाईचे संकटही उद्भवले आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील ऊसाला चारा म्हणून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. येवला, चांदवड, मनमाड, सिन्नर आदी ठिकाणचे पशुपालक चाऱ्यासाठी निफाड तालुक्यातून ऊस घेऊन जात आहेत.

साधारणपणे 4 हजार ते 6 हजार रुपये गुंठ्याप्रमाणे ऊस विकला जात आहे. दररोज तालुक्यातून शंभरच्या आसपास ट्रॅक्टर भरून जात आहेत. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने दुग्ध उत्पादनावरही या दुष्काळाचा परिणाम भविष्यात दिसून येणार आहे. पाऊस न झाल्यास तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर उसाची विक्री होईल. गाळपासाठी कारखान्यांना ऊस मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik News : नाशिकच्या सर्व बाजार समितीत कांदा लिलाव बंद; संतप्त शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

जूनमध्ये पाऊस न झाल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, गवत, खोडेची पेरणी करता आली नाही. त्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. साठवून ठेवलेला कोरडा चारा संपला आहे. हिरवा चारा म्हणून लागवड केलेले गवत, घास पावसाअभावी वाळून गेले आहेत. त्यामुळे निफाड तालुक्यातील ऊस विकत आणून पशुधन जगविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

– पोपट काळे, पशुपालक, रेडगाव, ता. चांदवड.

“शरद पवारांच्या सभेला गर्दी करा, आपल्याशिवाय कोणीही…”; प्रफुल्ल पटेलांच्या कार्यकर्त्यांना सूचना

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *