Thursday, April 25, 2024
Homeनगरपुराच्या पाण्यात अडकली रूग्णवाहिका, पहा पुढे काय झाले?

पुराच्या पाण्यात अडकली रूग्णवाहिका, पहा पुढे काय झाले?

करजगाव |वार्ताहर| Karajgav

नेवासा तालुक्यातील (Newasa) करजगाव (Karajgav) -गणेशवाडी-सोनई (Sonai) व करजगाव-लांडेवाडी मार्गावरती करजगाव (Karajgav) येथिल लेंडगा नाल्यात (ओढ्यात) पेशंटला घेऊन जात असतांना रूग्णवाहिका (Ambulance) बंद पडली. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे तरूणांच्या सहकार्याने व ट्रॅक्टरच्या (Tractor) मदतीने रूग्णवाहिकेला (Ambulance) ओढुन काढले.

- Advertisement -

वीजेच्या शॉकने तरूण शेतकर्‍याचा दुर्देवी मृत्यू

नाल्यावरून पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने वाहतुक विस्कळीत झाली. काल मुळाकाठ परिसरातील करजगाव (Karajgav) , पानेगाव (Panegav), शिरेगावसह राहुरी (Rahuri) व नगर तालुक्यात (Nagar Taluka) झालेल्या जोरदार पावसामुळे ओढे नाले भरभरून वाहत आहे. काही ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडुन वाहत आहे. या नाल्यावरच्या पुला संदर्भात वारंवार ग्रामस्थांनी मागणी केल्या असतांना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू

या ठिकाणी उपस्थित मुळा धरण कृती समितीचे उपाध्यक्ष ठकाजी बाचकर, सावळेराम कोरडकर, सुरेश बर्डे, तुळशीराम आयनर, देवराम बाचकर, अशोक गायकवाड, बिरू बाचकर, तुषार गायकवाड, आकाश गायकवाड, सुशील गायकवाड, भीमराज गायकवाड, शांती प्रसाद गायकवाड आदी तरुणांनी मदत केली.

तसेच करजगाव-लांडेवाडी रोडवरील ओढ्यावरही मोठ्या प्रमाणात वेगात पाणी असल्यांमुळे दोन मोटारसायकल व एक सायकल वाहुन गेली. त्यापैकी एक मोटारसायकल तरूणांना पाण्यातुन बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये आण्णा कोळेकर, दादा कोळेकर, ज्ञानदेव माळी, गणेश बर्डे आदीसह मदने वस्तीवरील तरूणांनी मदत कार्य केले.

अनेक वर्षापासुन या ओढ्याची उंची वाढविण्याची व नवीन पुल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या