Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेरमधून पूरग्रस्तांसाठी वस्तूरुपी मोठी मदत रवाना

संगमनेरमधून पूरग्रस्तांसाठी वस्तूरुपी मोठी मदत रवाना

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संकटाच्या वेळी इतरांना मदत करण्याची परंपरा संगमनेरकर यांनी यावेळेसही जपली असून राज्याचे लोकनेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मधून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोळा केलेल्या वस्तूरुपी मदतीचा ट्रक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात आला.

- Advertisement -

‘एक हात मदतीचा’ या योजनेअंतर्गत युवक काँग्रेस, एनएसयुआय, अल्पसंख्यांक काँग्रेस सेल, अनुसूचित जाती जमाती, जयहिंद युवा मंच यांनी कोल्हापूर व कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता मोठ्या प्रमाणात वस्तूरुपी मदत गोळा केली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत हा मदत रथ कोल्हापूरकडे रवाना करण्यात आला.

कोकणात व कोल्हापूर परिसरात आलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी अनेक वस्तूरुपी मदत गोळा केली. यामध्ये किराणा किट, कपडे, ब्लँकेट, सतरंजी, पाणी बॉक्स, बादल्या, अशा एक ना अनेक वस्तूंचा समावेश आहे.

नामदार थोरात म्हणाले, मागील वर्षी कोल्हापूरमध्ये मोठा पूर आला होता. त्यावेळी संगमनेर शहरातील अनेक तरुण याठिकाणी स्वयंसेवक म्हणून पंधरा दिवस कार्यरत होते. याही वेळेस तरुणांनी दिलेल्या हाकेला शहरातील नागरिकांनी व तालुक्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून अनेक गृहोपयोगी व दैनंदिन वापराच्या वस्तू मोठ्या प्रमाणात गोळा झाल्या आहेत. यातून तेथील नागरिकांना नक्कीच मदत होणार आहे. मदतीचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केले तर गौरव डोंगरे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या