मनपा हद्दीत चार्जिंग स्टेशनसाठी जागा निश्चित

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापलिका पीपी तत्त्वावर चार्जिंग स्टेशन ( Charging Stations ) उभारणार आहे. त्यासाठी जागा निश्चितीसाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नगररचना विभागाने सर्वेक्षण करून इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनसाठी 106 जागा निश्चित केल्या आहे.त्यापैकी नाशिक पूर्व 19,नाशिक पश्चिम 7, पंचवटी 25, नाशिकरोड 18, नवीन नाशिक 25, सातपूर 12 अशा 106 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन ( Electrical Vehicls Charging Stations ) उभारण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी तज्ञ एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. चार्जिंग स्टेशन्साठी लागणारी जागा, चार्जिंग किट संख्या, चार्जिंग क्षमता आदी बाबींचा मास्टर प्लॅनमध्ये समावेश राहणार आहे.

या बाबतचे नगररचना विभागाचा सर्व पुर्ण झाला असून प्रस्ताव विद्युत विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अशा वर्दळीच्या शासकीय कार्यालयाबरोबरच खासगी जागांवर चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. प्रस्तावाला लवकरच गती मिळण्याची चिन्हे आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *