Thursday, April 25, 2024
Homeधुळेसावळदे येथील प्राध्यापकास मारहाण करून दरोडा घालणाऱ्या पाच आरोपींना चार तासात अटक

सावळदे येथील प्राध्यापकास मारहाण करून दरोडा घालणाऱ्या पाच आरोपींना चार तासात अटक

शिरपूर : Shirpur

तालुक्यातील सावळदे येथे प्राध्यापकास मारहाण करून दरोडा टाकून लुट करणाऱ्या टोळीच्या अवघ्या चार तासात मुसक्या आवळून शिरपूर शहर पोलिसांनी आरोपींना जेरबंद करत मुद्देमाल हस्तगत केला आहे.

- Advertisement -

सावळदे येथील एस.व्ही.के.एम.संस्थे जवळ प्रा.समीर निरंजन मिश्रा यांना अज्ञात चोरट्यांनी मारहाण करत त्यांच्या हातातील बोटातील एकूण सहा सोन्याच्या अंगठ्या घेऊन काही चोर पळून गेले होते. त्यात प्राध्यापक यांचे जाब जबाब घेतल्यानंतर शहर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली.

शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी, पोलीस सहाय्यक निरीक्षक गणेश फड, पीएसआय किरण बार्हे, पीएसआय संदीप मुरकुटे इत्यादींनी तपास कामाला सुरुवात करून साध्या वेशात पोलिसांना सावळदे गावाजवळ पाळत ठेवण्यास सांगितले होते. या दरम्यान काही संशयितांवर संशय आला असता त्यांची कसून चौकशी केली. पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर असलेला गुन्हेगार मुकेश उर्फ पप्पू कोळी यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा मान्य करत इतर साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार तात्काळ पोलिसांनी इतर आरोपींना ताब्यात घेतले असून काही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.

सदर प्रकरणात शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे भाग ५, गुन्हा रजिस्टर नंबर १७१/२०२१ भा दं वि कलम ३९२, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती मुकेश उर्फ पप्पू कोळी (वय २६), गोरख मखन कोळी (वय ३२), दिनेश वसंत जगदेव (वय ३०) हे तिन्ही रा. सावळदे ता.शिरपूर या आरोपींना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यात मदत करणारे ईश्वर शिवलाल भोई (वय ४२) रा. बहाळ ता. चाळीसगाव, जुबेर इब्राहिम खाटीक (वय २८) रा. शिंगावे ता. शिरपूर अशा एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली. त्याच्या कडून सहा पैकी पाच सोन्याच्या अंगठ्या व युनिकॉर्न मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. शहर पोलिसांनी केलेल्या धाडसी तपासा बद्दल शहर पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित धुळे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव (धुळे), उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस उपनिरीक्षक किरण बार्हे, कॉन्स्टेबल संदिप रोकडे, अभिजीत ढेपे, महेंद्र सपकाळ, अरविद वाघ, अमोल धिवरे, चालक हरून शेख या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या