Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशकात पाच हजार खाटा रिक्त

नाशकात पाच हजार खाटा रिक्त

नाशिक | Nashik

शहरातील १८८ रुग्णालयांत ८ हजार २१४ खाटा कोविड रुग्णांसाठी होत्या. त्यातील ५ हजार ७७५ खाटा रिक्त झाल्या आहेत. सध्या २४३९ खाटांवरच रुग्ण आहेत. ऑक्सिजनचे २ हजार ४७७ तर व्हेंटिलेटर्सचे ४६३ बेड्स सध्या उपलब्ध आहेत. दरम्यान, नाशिक महानगरपालिकेने कोणत्याही कोविड रुग्णालयाला नॉन कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यास परवानगी दिलेली नाही. तसेच कोविड सेंटर्सदेखील अद्याप बंद केलेले नाही.

- Advertisement -

शहरातील पंधरा कोविड केअर सेंटर्समध्येदेखील रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यात महापालिकेच्या मेरी कोविड केअर सेंटरमध्ये १८० पैकी १३२, समाजकल्याण विभागाच्या जागेतील पाचशे पैकी ३०९ आणि ठक्कर डोममध्ये ३२५ पैकी २९७ खाटा रिक्त आहेत.

महापालिकेच्या बिटको सेंटरमधील चारशे पैकी केवळ १२ जनरल खाट शिल्लक आहेत. त्याठिकाणी अजूनही रुग्ण दाखल आहेत. शहरातील काही सेवाभावी संस्थांच्या कोविड सेंटर्समध्येदेखील बऱ्यापैकी जागा रिक्त झाल्या आहेत.

येथील रुग्णसंख्या शून्य
शहरातील पाच कोविड सेंटर्समध्ये आता रुग्ण संख्या शून्य झाली आहेत. यात डॉ. पारनेरकर महाराज हॉस्पिटलमध्ये पंधरापैकी पंधरा खाटा रिकाम्या झाल्या आहेत. नाशिकरोड येथील फायर क्वॉटर्समध्ये देखील पन्नासच्या पन्नास खाटा रिक्त झाल्या आहेत. हॉटेल एमराल्ड पार्कमधील जैन इंटरनॅशनल सेंटरच्यादेखील पन्नास पैकी पन्नास, माहेश्वरी स्टुडंट्स सेंटर येथे ४२ पैकी ४२ तसेच कच्छी लोहाणा मंगल कार्यालयात वीस पैकी वीस म्हणजे सर्वच खाटा रिक्त आहेत.

महानगरपालिकेने कोणत्याही कोविड रुग्णालयाला नॉन कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यास परवानगी दिलेली नाही. तसेच कोविड सेंटर्सदेखील अद्याप बंद केलेले नाही.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे,वैद्यकीय अधीक्षक, नाशिक महानपालिका.

- Advertisment -

ताज्या बातम्या