Tuesday, April 23, 2024
Homeजळगावजळगावात पुन्हा गोळीबार ; गावठी कट्टा, काडतूससह तरूणाला अटक

जळगावात पुन्हा गोळीबार ; गावठी कट्टा, काडतूससह तरूणाला अटक

जळगाव – jalgaon

शहरातील एमआयडीसी पोलीस (police) ठाण्याच्या हद्दीतील फातीमा नगरात जुन्या वादातून तरूणाने एकावर गोळीबार केल्याची घटना गुरूवारी 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. स्वप्नील उर्फ सोपान चांदुसिंग परदेशी (वय-25, रा.कुसुंबा ता.जि. जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान गत दीड महिन्यात गोळीबाराची ही तिसरी घटना असल्याने जळगावची वाटचाल बिहारकडे सुरू झाली की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टर मधील प्रभा पॉलीमर कंपनीसमोर गुरूवारी 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जुन्या वादातून स्वप्निल परदेशी यांनी गावठी गट्टा घेवून आकाश तवर यांच्यात शाब्दिक वाद झाला. या रागातून स्वप्निल परदेशी याने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून आकाशवर 2 वेळा गोळीबार केला. सुदैवाने यात आकाशला कोणतीही दुखापत झालेली नाही. ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, एमआयडीसी पोलीसांना गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून संशयित आरोपी सोपान परदेशी याला ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतूस हस्तगत केले आहे.

16 हजारात घेतला गावठी कट्टा

जुना वादामुळे सोपानने तीन दिवसांपुर्वीच 16 हजार रूपयात गावठी कट्टा आणि तीन काडतूस खरेदी केले होते. असे पोलीसांच्या चौकशीतून समोर आले आहे. घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सपोनि दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, इम्रान सैय्यद यांच्यासह आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या