Tuesday, April 23, 2024
Homeधुळेजि.प शाळा,ग्रा.पं कार्यालय परिसरात मद्यपींची भरते जत्रा

जि.प शाळा,ग्रा.पं कार्यालय परिसरात मद्यपींची भरते जत्रा

सौंदाणे – Dhule – saudane – वार्ताहर :

धुळे तालुक्यातील वडजाई येथील अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा पटांगण व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात दररोज सायंकाळी मद्यपींची जत्रा भरत आहे. त्यामुळे सकाळी याठिकाणी दारूच्या बाटल्या, पाणी पाऊच, प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या, गावठी दारूच्या पोटल्यांचा खच पडलेला असतो. दररोज सकाळी अंगणवाडी, शाळा उघडण्याआधी कर्मचार्‍यांना स्वच्छता करावी लागते. दररोजच्या या प्रकारामुळे कर्मचारी व नागरिक वैतागले आहे. त्यामुळे या मद्यपींवर कारवाईची मागणी होत आहे.

- Advertisement -

अंगणवाडी व ग्रा.प. कार्यालयात दररोज सकाळी स्वच्छता केली जाते. तरी देखील मद्यपींचा सायंकाळी खुलेआम वावर दिसून येतो. मद्यपी धुळे शहरातून देशी व विदेशी दारू आणून या शासकीय कार्यालयाच्या ओट्यांवर बिनधास्तपणे बसतात. तासनतास त्यांच्या गप्पा रंगतात.प्रसंगी मद्यावस्थेत काहींची हुमरीतुमरी, भांडणे देखील होतात.

तसेच वडजाई जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला खुलेआम गावठी दारूची विक्री होते. त्या ठिकाणाहून गावठी दारूच्या पोटल्या शाळेमध्ये आणून मद्यपी खुलेआम शाळेच्या पटांगणात बसून मद्य पितात. त्यात दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टीकचे ग्लास, पाणी पाऊच, बाटल्या तेथे उघड्यावर फेकतात. याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे.

दरम्यान शिक्षणाचा कणा म्हणून लहान वयात अंगणवाडी व जिल्हा परिषद या शाळांना ग्रामीण भागात महत्व असतांना त्याच ठिकाणी दररोज सायंकाळी चक्क मद्यापींच्याा मैफिली रंगतात. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान सौंदाणे, बाबुळवाडी, पिंपरी या परिसरात गावठी दारूचाी खुलेआम विक्री होते. याकडे प्रशासनानक लक्ष देण्याची गरज आहे. मोहाडी पोलिसांनी रात्रीची गस्त लावून वडजाई परिसरातील अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सर्रासपणे मद्य पिणार्‍यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या