Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात साडेतेरा लाख नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यात साडेतेरा लाख नागरिकांचे लसीकरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी पाच ते दहा हजार होणारे लसीकरण ( Corona Vaccination) सोमवारी अचानक वाढले. जिल्हाभरात काल दुप्पट 170 केंद्रांवर दोन्ही मिळून 25 हजार 997 जणांना करोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 13 लाख 66 हजार 985 नागरिकांना लस देण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यापासून करोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्याचा सामना करत अडखळत लसीकरण सुरू आहे. शहर तसेच जिल्ह्यात लसींची मागणी वाढली आहे. पंरतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसींचा तुटवडा जाणवत होता.

आतापर्यंत आठडाभरात सरासरी 13 ते 15 हजार लसी जिल्ह्यासाठी उपलब्ध होत होत्या. रविवारी जिल्ह्याला 38 हजार लसी उपलब्ध झाल्याने लसीकरणाचा वेग वाढल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

16 जानेवारी 2021 पासून संपूर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र गेल्या दीड महिन्यापासून लसींचा तुटवडा असल्याने 300 पैकी निम्मे लसीकरण केंद्र बंद होते.

नाशिक पालिका हद्दीत 3 हजार 8, ग्रामीण जिल्ह्यात 8 हजार 67, मालेगाव 942 असे लसीकरण झाले आहे. तर 12 हजार 744 जणांना दुसरा डोस देण्यात आला. यामध्ये 18 ते 44 वयोगटातील सर्वाधिक 10 हजार 185 जणांना लस देण्यात आली आहे.

तर आतापर्यंत 44 ते 60 वर्षांपुढील सर्वाधिक 5 लाख 17 हजार 633 नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत 2 लाख जणांचे लसीकरण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या