Friday, April 26, 2024
Homeधुळेराष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी ‘फिल्डींग’

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी ‘फिल्डींग’

धुळे Dhule। प्रतिनिधी

पक्षात कोणतीही गटबाजी (Factionalism in the party) नाही, पक्षनेत्वातंर्गत पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत. पक्षात शिस्तीला महत्व असून पक्ष(party) सांगेल तो आदेश मानून काम केले जाते, अशा प्रकारची भाषणे बाहेरुन आपल्या जिल्ह्यात दौर्‍यावर आलेले नेते मंडळी करतात. नुकताच राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे (NCP leader Supriya Sule) यांचाही दौरा झाला. राष्ट्रवादी भवनात बोलतांना त्यांनी पक्ष संघटन (Party organization) व मोर्चेबांधणीवर भर दिला. असे असले तरी रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्ष पदासाठी (District President post) जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या गटांमधून इच्छूकांच्या नावाची शिफारस (Recommended names of aspirants) झाल्याचे समजते.

- Advertisement -

पक्ष नियमानुसार मावळते अध्यक्षांचे मत जाणून घेतले जाते. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या किरण शिंदे यांना स्वतंत्रपणे अहवाल देेणे सुचित करण्यात आले असून, त्यांनी त्यांच्या अहवालात जिल्हाध्यक्ष (District President post) पदासाठी काही नावे निर्देशित केली आहेत. मात्र पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष (State Vice President) म्हणून जबाबदारी पेलणारे माजी आ.अनिल गोटे हे याच जिल्ह्यातील असल्याने त्यांचाही स्वतंत्र अहवाल पक्षश्रेष्ठींना अपेक्षित आहे. त्यामुळे श्री.गोटे यांनी साक्री तालुक्यातील काही नावांसह आपल्या निकटवर्तीय कार्यर्त्याचे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी शिफारस (Recommended names) केल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून बोलले जात आहे.

दुसरीकडे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे (Former District President Sandeep Bedse) हेही या पदासाठी इच्छूक असून त्यांनी काही नेत्यांच्या शिफारशीसह प्रयत्न चालविले आहेत. ज्ञानेश्वर भामरे, शिरपूरचे दिनेश मोरे, साक्रीचे पोपटराव सोनवणे, सुरेश सोनवणे, जितेंद्र मराठे, डॉ.जितेंद्र ठाकुर, नगावचे प्रशांत भदाणे, सत्यजित सिसोदे यांच्यासह काही नावे चर्चेत असून प्रत्येकाने आपापल्या परिने ‘फिल्डींग’(‘Fielding) लावणे सुरु केले आहे. यापैकी काहींनी तर प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षनिरिक्षक अर्जुनराव टिळे यांच्या भेटी घेवून आपला कार्यअहवाल सादर केल्याचेही बोलले जाते आहे.

मात्र एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चार दिवसांपूर्वी धुळ्यात येवून गेलेल्या खा.सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी जिल्ह्यातील पक्षाची सध्यस्थिती, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पक्षबांधणीसाठी योगदान, सामान्य माणसांचे प्रश्न घेवून होणारी आंदोलने, त्यात पदाधिकार्‍यांचा असलेला सहभाग याबाबतची इत्यंभूत माहिती आपल्या व्यक्तीगत डायरीत नोंद करुन घेवून गेल्याची चर्चा आहे.

अर्थातच याबाबतची माहिती त्या प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहचवतील. त्यामुळे कुणी कतीही कार्यअहवाल सादर केले किंवा कुणाच्याही सोबतीने मुंबईच्या वार्‍या केल्यात, अथवा वेगवेळ्या नेत्यांच्या मध्यमातून फिल्डींग लावण्याचा प्रयत्न केला तरी, पक्षश्रेष्ठींना वस्तूस्थिती माहिती आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाची माळ खालून जाणार्‍या शिफारशीने नव्हे तर, वरुन पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयानुसार कार्यक्षम व्यक्तीच्या गळ्यात पडेल, असे बोलले जाते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या