पहिल्याच दिवशी 500 भावी पोलिसांची मैदानी चाचणी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा पोलीस दलातर्फे (District Police Force) पोलीस शिपाई पदाच्या (Police Peon) 128 जागांसाठी भरती प्रकिया (Recruitment process) राबविण्यात आली आहे. लेखी परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या 1 हजार 617 उमेदवारांच्या शारिरीक चाचणी, कागदपत्र तपासणी तसेच मैदानी चाचणीला (Field testing) मंगळवारपासून पोलीस कवायत मैदानावर सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 500 हून अधिक उमेदवारांची मैदानी चाचणी झाली आहे.

जिल्हा पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस कवायत मैदानात आज पोलीस भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलीस शिपाई पदासाठी 21 हजार 690 उमेदवारांची लेखी परीक्षा दिली होती. उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. लेखी परिक्षेतून 1 हजार 617 उमेदवार पात्र झाले आहेत. त्यापैकी पुरूष उमेदवारांची 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान तीन दिवस शारिरीक चाचणी, कागदपत्र तपासणी, तसेच मैदानी चाचणी घेण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षकांकडून भरती प्रक्रियेचा आढावा

मंगळवारी सकाळी 7 वाजेपासून प्रक्रियेला सुरुवात झाली. यात शारिरीक चाचणीत छाती उंची मोजण्यात आली. यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी करण्यात आली. कागदपत्राच्य तपासणीत पात्र ठरल्यानंतर उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. शारिरीक चाचणीत 10 ते 12 जण तर कागदपत्र तपासणीत 9 ते 10 जण अपात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या 500 हून अधिक उमेदवारांची 1600 मीटर धावणे व 100 मीटर धावणे, तसेच गोळा फेक अशी मैदानी चाचणी घेण्यात आली.

सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस कवायत मैदानावर जावून प्रक्रियेचा आढावा घेतला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इन कॅमेरा ही प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्येक चाचणीचे तसेच उमेदवारांचे व्हिडीओ चित्रण केले जात आहे.