सण उत्सवाच्या अनुषंगाने शहर पोलिसांची कारवाई

jalgaon-digital
1 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर येथील शहर पोलीस स्टेशनकडून आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने शहर हद्दीमध्ये चोरून अवैद्य दारूचे धंदे करणार्‍या आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली.

तसेच दारू पिऊन वाहन चालवणार्‍या दोघांविरुद्ध ड्रंक अँड ड्राईव्हप्रमाणे कारवाई करण्यात आली असून सीआरपीसी कलम 149 प्रमाणे 16 आरोपींविरुद्ध तर सीआरपीसी कलम 107 प्रमाणे 14 इसमाविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. ईद-ए-मिलाद उत्सवाच्या अनुषंगाने श्रीरामपूर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार होमगार्ड व एसआरपी प्लाटून (पुणे)चे अंमलदार यांचेसह श्रीरामपूर वॉर्ड नंबर 2 परिसरात रूट मार्च करण्यात आला.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्याकडून आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांच्या मदतीने वरीलप्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याचे श्री. गवळी यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *