Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककोळगावला शेतकर्‍यांसाठी बांधावर खते

कोळगावला शेतकर्‍यांसाठी बांधावर खते

करंजीखुर्द । वार्ताहर

कोळगाव येथे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही करोनाचे संकट पाहता कृषीसेवा केंद्रावर गर्दी होऊ नाही म्हणून कृषिमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून शेतकर्‍यांना खते व बियाणे थेट शेतकर्‍याच्या बांधावर भेटले पाहिजे असे नियोजन कृषी विभागाने केले आहे. कोळगाव येथे कृषी विभागामार्फत थेट शेतकर्‍याच्या बांधावर खते व बियाणे वाटप करण्यात आले.

- Advertisement -

कोळगाव येथे शेतकर्‍यांना खते वाटपप्रसंगी विभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वानखेडे, तालुका कृषी अधिकारी पाटील यांनी शेतकर्‍यांशी खरीप हंगामाबद्दल चर्चा केली व केलेल्या नियोजनाप्रमाणे वाटप करण्यात आले. यावेळी युरिया (470 बॅग), सोयाबीन (200 बॅग), रायझोबीयम (150 कि. ग्रॅम), पीएसबी (150 कि. ग्रॅम) वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बालाजी कृषि सेवा केंद्र निफाडचे गिते, मं. कृषी अधिकारी सोमवंशी, कृषि पर्यवेक्षक राहणे, कृषी पर्यवेक्षक कापरे, कृषि सहाय्यक साठे, कृषी सहाय्यक मोगरे, सूर्यसाक्षी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मंडळ, सरपंच व शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाकडून जास्त प्रमाणात शेतकर्‍यांनी व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी एकत्र येऊन मागणी करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.

याप्रसंगी अंबादास घोटेकर, दत्तात्रेय घोटेकर, नामदेव घोटेकर, त्र्यंबक गारे, तुषार घोटेकर, शिवाजी वाघ, माधव घोटेकर, गणेश घोटेकर, जालिंदर घोटेकर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या