Saturday, April 27, 2024
Homeनाशिकहेल्मेट मोहीमे बाबत पोलीस आयुक्त म्हणाले...

हेल्मेट मोहीमे बाबत पोलीस आयुक्त म्हणाले…

नाशिक । प्रतिनिधी Nashik

माजी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय (Former Commissioner of Police Deepak Pandey )यांची नुकतीच बदली झाल्याने नो हेल्मेट, नो पेट्रोल ( No Helmet No Petrolv )हा नियम अजूनही लागू आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला असताना नुकतेच नवनिर्वाचित पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेले जयंत नाईकनवरे ( Police Commissioner Jayant Naiknavare )यांनी सर्वांचा अभिप्राय घेऊन अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची कारकीर्द चांगलीच गाजली. त्यांनी सुरू केलेल्या नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर त्यांनी विनाहेल्मट वाहनचालकांना पेट्रोल देणार्‍या पंपचालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवणार अशी भूमिका घेतली. या भूमिकेला पेट्रोल पंपचालकांनी तीव्र विरोध केला. अशातच पाण्डेय यांची बदली झाली.

दरम्यान, नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेचा विडा उचलला आहे. मात्र अद्याप याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी नाईकनवरे म्हणाले की, नो हेल्मेट, नो पेट्रोल नियमासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित लोकांचा अभिप्राय आवश्यक आहे. मी शहरातील वाहनचालक, पेट्रोल डिलर्सना भेटणार आहे आणि पोलिसांशीही बोलणार आहे. तसेच संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, असे असले तरी कायद्यानुसार हेल्मेट घालणे अनिवार्य आहे, हे दुचाकीस्वारांनी लक्षात ठेवावे. शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेट घालता यावे यासाठी पाण्डेय यांनी शहरात नो हेल्मेट, नो पेट्रोल हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पेट्रोल डिलर्सना हेल्मेटशिवाय दुचाकीस्वारांना पेट्रोल विकण्यापासून रोखण्यात आले होते. पेट्रोलपंप डिलर्स हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल विकताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पाण्डेय यांनी दिला होता.

दरम्यान, पोलीस आयुक्त नाईकनवरे हे पेट्रोल पंपचालक, नागरिक, वाहनधारक यांच्याशी या मोहिमेअंतर्गत चर्चा करणार आहेत. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आता नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेसंदर्भात काय निर्णय होतो याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या