Saturday, April 27, 2024
Homeजळगावशेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरावी-जिल्हाधिकारी अमन मित्तल

शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरावी-जिल्हाधिकारी अमन मित्तल

जळगावात – jalgaon

शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरत शेतीकडे उद्योग म्हणून बघणे गरजेचे आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या काळात जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे. असा विश्वास जिल्हाधिकारी अमन मित्तल (Collector Aman Mittal) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. मित्तल अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी श्री. जगताप यांच्यासह इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या