डॉ.पवार यांचेपुढे समस्यांचा पाढा

jalgaon-digital
1 Min Read

देवगाव । वार्ताहर | Devgaon

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांचेशी परिसरातील नागरिकांनी भरवसफाटा येथे संपर्क साधत रस्त्यांसह पाणीपुरवठा (Water supply) समस्येची कैफियत मांडली.

तसेच विजेच्या वाढत्या भारनियमनाकडे लक्ष देण्याची मागणी केली. त्यावर तुमचे प्रश्न तत्काळ मार्गी लावू असे आश्वासन भारती पवार यांनी ग्रामस्थांना दिले. देवगाव ग्रा.पं. उपसरपंच लहानु मेमाने यांचेसमवेत ग्रामस्थांनी भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांची भेट घेत देवगाव-भरवसफाटा, देवगाव-कानळद या रस्त्यांची दुरावस्था (Bad condition of roads) झाली असून या दोन्ही रस्त्यांचे काम रखडले आहे. त्यामुळे सदरचे काम लवकर पूूर्ण करण्यात यावे. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत (National Drinking Water Scheme) पाणीपुरवठा (Water supply) योजनेचे काम मार्गी लावावे.

तसेच मरळगोई व धानोरे फिडर वरील सिंगलफेज योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. तसेच गेल्या तीन ते चार महिन्यापासून बंद असलेले ट्रान्सफार्मर दुरूस्त करून मिळावे आदी मागण्या यावेळी ग्रामस्थांनी मांडल्या. त्यामुळे तुमच्या सुचनांची दखल घेऊन वरीष्ठ अधिकारी व शासन दरबारी सोडविण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल असे आश्वासन भारती पवार यांनी ग्रामस्थांना दिले.

याप्रसंगी जगदीश लोहरकर, मच्छिंद्र आढांगळे, संदीप डुकरे, राजाराम मेमाने, किरण कुलकर्णी, मथुराबाई बोचरे, किशोर बोचरे, दगू बोचरे, रमेश शिंदे, संतोष गव्हाणे, संदीप लोहारकर, नितीन लोहारकर, बाबासाहेब चव्हाण, शरद घेगडमल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *